राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ‘लाडकी बहीण योजने’ च्या हप्त्याबाबत एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेचा मासिक हप्ता ₹1500 वरून ₹2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीत, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुख्यमंत्र्यांचे आणि महसूल मंत्र्यांचे स्पष्टीकरण
या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले की, “आम्ही लाडक्या बहिणींना ₹2100 देण्याचे वचन विसरलेलो नाही. आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. आणि हळूहळू परिस्थिती सुधारल्यावर ₹2100 चा हप्ता लवकरच सुरू केला जाणार आहे.”
त्यांच्या घोषणेला दुजोरा देत महसूल मंत्री बावनकुळे यांनीही ‘लाडकी बहीण योजनेचा हप्ता ₹2100 केला जाईल’, असे जाहीर केले आहे. मात्र, ₹1500 ऐवजी ₹2100 चा हप्ता नेमका कधीपासून सुरू होईल, याबाबत कोणतीही निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० कधी मिळणार? मुख्यमंत्री माहिती युट्युब व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या घोषणा
याशिवाय, महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी इतरही काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत:
- कर्जमाफी (Karjmafi news): खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज असलेल्या गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करणार आहे.
- वीज बिलात सवलत: पुढील पाच वर्षांसाठी शेतातील पंपाचे आणि विजेचे बिल माफ केले जाणार आहे.
- घरगुती वीज दर: घरगुती वीज बिलाचे दर प्रति युनिट ₹8.20 वरून ₹6 पर्यंत कमी केले जाणार आहे.
- पांधन रस्त्यांसाठी निधी: अमरावती जिल्ह्यातील पांधन रस्त्यांसाठी विशेष निधी दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते मिळणार आहे.
एकंदरीत, ‘लाडकी बहीण योजने’चा वाढीव हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठीही काही दिलासादायक घोषणा करण्यात आलेल्या आहेत.