Land Map: आता घरी बसल्या काढा आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा

Land Map: शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्या येण्यासाठी नवा रस्ता तयार करायचा असल्यास किंवा जमिनीची हद्द माहिती करून घ्यायची असेल तर शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा असणे खूप महत्त्वाचे आहे. हा शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर भूमी अभिलेख कार्यालय किंवा सिटीसर्वे ऑफिस या ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या परंतु आता सरकारने ज्याप्रमाणे सातबारा (Land Record) उतारा व आठ अ उतारा ऑनलाइन उपलब्ध केला आहे. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या जमिनीचा व जागेचा नकाशा ऑनलाईन काढू शकता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची वेळ आणि पैशाची बचत नक्कीच होणार आहे. पाहूयात याविषयी सविस्तर अशी माहिती.

Land Map: आता घरी बसल्या काढा आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा

Land Map जमिनीचा नकाशा कसा काढावा?

आपल्या जमिनीचा नकाशा काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp या वेबसाईट वरती जावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल यापेक्षा डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हे एक ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला तुमचं राज्य ग्रामीण असेल तर ग्रामीण किंवा अर्बन असेल तर शहरी असे दोन पर्याय दिसतील तुम्ही ज्या भागात राहत असाल त्या सोयीनुसार आपण ग्रामीण किंवा शहरी भाग निवडून घ्यावा.

त्यानंतर आपला जिल्हा तालुका व या गावचा आपल्याला नकाशा काढायचा आहे ते निवडून घ्यायचे आहे आणि शेवटी व्हिलेज मॅप या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे. हे सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपली जमीन ज्या गावांमध्ये आहे त्या गावचा नकाशा आपल्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल.

Phone Pe Personal Loan
फोन पे वरून दररोज कमवा 1000 रुपये; घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमवा Phone Pe Personal Loan

त्या ठिकाणी होम हा एक पर्याय आहे या पर्यावरण क्लिक करून तुम्ही नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता. डाव्या बाजूला प्लस आणि मायनस या बटनचा वापर करून आपण नकाशा लहान किंवा मोठा करू शकता. त्यानंतर आपल्याला डावीकडे तीन आडव्याता रेषेवर क्लिक केल्यास आपण पहिल्या पेज वरती वापस येऊ शकतो.

वरील जो प्रोसेस आहे या प्रशासनावर आपण पूर्ण गावचा नकाशा पाहू शकता त्यानंतर आता आपण आपल्या

जमिनीचा प्लॉट नंबर सहित नकाशा कसा काढावा हे पाहुयात.

वरील माहिती प्रमाणे नकाशा या वेबसाईट वरती सर्च बाय प्लॉट नंबर हा एक पर्याय त्या ठिकाणी त्यावर ती आपला गट क्रमांक टाकून आपण आपल्या जमिनीचा नकाशा पाहू शकता. डावीकडील प्लॅटफॉर्म हा एक पर्याय आहे त्यावर क्लिक करून शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्यांच्या नावावर किती जमीन आहे याची माहिती आपल्याला दिसेल.

प्राजक्ता माळी चे हे फोटो पाहून तुम्ही व्हाॅल चकित! Prajakta Mali new look

एका गट क्रमांक मध्ये किती शेतकऱ्यांचे शेतजमिनी आहे त्यांची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळेल ही सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्याला शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा एक पर्याय त्या ठिकाणी दिसतो त्यावर क्लिक केल्यास आपण आपल्या शेत जमिनीचा नकाशा डाऊनलोड करू शकतो.

Leave a Comment