Land Record: शेतीसाठी जमीन खरेदी करताना लक्षात ठेवायच्या 5 गोष्टी

Land Record: जमिन खरेदीचा विचार करताना काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे असते. हे मुद्दे पाळले तर तुमच्या जमिन खरेदीची प्रक्रिया सुरळीत होईल आणि भविष्यातील कोणत्याही अडचणी टाळता येतील. या मुद्द्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 5 things to keep in mind while buying land for agriculture

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record: जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा तपासणे

जमीन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्या जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा तपासणे महत्वाचे आहे. सातबाऱ्यावर जमिनीची मालकी, क्षेत्रफळ आणि सीमा इत्यादी माहिती असते. तर फेरफार उताऱ्यावरून तुम्हाला जमिनीच्या मालकी हक्कातील बदल समजतील.

सातबाऱ्यावरील नावे ही विक्रेत्याचीच आहेत की नाही हे तपासणे महत्वाचे आहे. जर तुम्ही या आगोदर जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला जुन्या मालकाचे नाव असेल ते काढून टाकावे लागेल आणि ते आवश्यक आहे. तुमच्या तसेच या जमिनीवर कोणत्याही बॅंक किंवा संस्थांचा कर्जाचा बोजा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. MP Land Record

भूधारणा पद्धत तपासणे (Check grounding method)

जमीन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सातबाऱ्यावर नमूद केलेल्या भूधारणा पद्धतीचेही निरीक्षण करावे लागेल. भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीअंतर्गत येणाऱ्या जमिनींचे हस्तांतरण शासनाच्या परवानगीशिवाय होऊ शकते. परंतु भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत येणाऱ्या जमिनींचे हस्तांतरण करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असते.

जमिनीचा नकाशा पाहणे (Viewing the land map)

जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे महत्वाचे आहे. नकाशामुळे तुम्हाला जमिनीची सीमा आणि चतुःसीमा स्पष्टपणे समजेल. तसेच जमिनीपर्यंत जाण्यासाठी कोणता रस्ता वापरावा लागेल याची माहितीही नकाशामुळे मिळेल.

शेतरस्ता तपासणे (Checking farm roads)

जर तुम्ही बिनशेती जमीन खरेदी करत असाल तर त्या जमिनीपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता नकाशामध्येच दाखवलेला असतो. परंतु जर जमीन शेती असेल आणि रस्ता खाजगी असेल तर रस्त्यासाठी दाखवलेल्या जमिनीच्या आणि संबंधित मालकांची हरकत नसल्याची खात्री करणे गरजेचे आहे.

Land Record: खरेदीखत करणे

वरील सर्व बाबी तपासल्यानंतर तुम्हाला तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील आणि आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे लागेल.

एकंदरीत, जमीन खरेदी करताना वरील सर्व मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि तुमची जमीन खरेदीची प्रक्रिया सुरळीत होईल.

40 तालुक्याची दुष्काळी अनुदान यादी 2024 जाहीर

Leave a Comment