MSRTC Bharti कोणतीही परीक्षा न देता एस टी महामंडळामध्ये भरती पगार ३० हजार

By Bhimraj Pikwane

Published on:

MSRTC Bharti : तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि आयटीआय कोर्स केला असले तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही भरती सातारा विभागासाठी होणार असून नुकतीच एस. टी. महामंडळाने अधिसूचना जाहीर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यामध्ये अप्रेंटीस म्हणजेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तेव्हा या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या

मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा

मेकॅनिक डिझेल – ३४ जागा

मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा

ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा

वेल्डर – २ जागा

टर्नर – ३ जागा

प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा

एकूण रिक्त पदसंख्या – १४५ जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याने संबधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन – (मासिक)

मोटार मेकॅनिक वाहन – ८ हजार ५० रुपये

मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये

मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये

ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये

वेल्डर – ७ हजार ७०० रुपये

टर्नर – ८ हजार ५० रुपये

प्रशितन व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये

नोकरी ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाइन आणि ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२४

अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१

अर्ज प्रक्रिया

या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. प्रथम वर दिलेल्या सरकारच्या अप्रेंटीस नोंदणी वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यावर त्या अर्जाची प्रत संबधित पत्त्यावर पाठवायची आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

 

या भरती संदर्भातील जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment