मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत (Mukhyamantri Annapurna Yojana) पात्र महिलांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यात येत असतात. ज्या महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत आणि ज्यांच्याकडे ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना’ (PM Ujjwala Yojana) चे कनेक्शन आहे किंवा ज्यांच्या नावावर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
२०२४-२५ चा निधी जमा झाला
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी तीन गॅस सिलेंडरचे अनुदान यापूर्वीच थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्यांना मागील वर्षाचा लाभ मिळाला नसेल, त्यांनी आपले बँक खाते तपासावेत.
२०२५-२६ साठीचे अनुदान कधी मिळणार?
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे अनुदान ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहेत. राज्य सरकारने यासाठी विविध विभागांना निधी वाटप करण्यास सुरुवात केली आहेत.
उदाहरणार्थ, १० जुलै २०२५ रोजी आदिवासी विकास विभागाला अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
अनुदानाचे नियम आणि इतर लाभार्थ्यांसाठी माहिती
लाभार्थ्यांना दरमहा जास्तीत जास्त एक सिलेंडरचे अनुदान मिळते आणि एका वर्षात एकूण तीन सिलेंडरवर अनुदान मिळते.
सामान्य आणि अनुसूचित जाती (SC) यांसारख्या इतर श्रेणीतील लाभार्थ्यांसाठीही निधी लवकरच वितरित केला जाईल आणि त्यांचेही तिन्ही गॅस सिलेंडरचे अनुदान ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये DBT द्वारे खात्यात जमा केले जाईल.
तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात का? तुम्हाला मागील वर्षाचे अनुदान मिळाले आहे का?