Namo Shetkari Yojana Beneficiary Status : नमो शेतकरी योजनेचे 2,000 रूपये आले का? घरबसल्या चेक करा…
नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रूपये आज दि. 0 2 एप्रिल पासून DBT द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहेत. राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँकेत जमा झाला आहे का नाही? हे तुम्हांला मोबाईल वर घरबसल्या चेक करता येते. अनेक शेतकऱ्यांना आपले नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे समजत नाही. आणि यासाठीच आपण घरबसल्या 2 हजार रुपये जमा झालेत का? नाही हे कशाप्रकारे चेक करायचे हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये मिळाला का? चेक करा!
हप्ता चेक करण्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे
1) सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत लिंकवर क्लिक करायचे आहे. https://nsmny.mahait.org/
2) त्यानंतर Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करायचे.
3) त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर Enter Mobile number टाकावा लागतो.
4) नंतर कॅप्चा कोड खाली टाकावा
5) त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो खाली टाकावा
6) त्यानंतर Get Data गेट डाटावर क्लिक करायचे.
7) त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसते. कोणता हप्ता किती तारखेला कोणत्या बँकेत जमा झालेला आहे त्यात तुम्हाला आताचा (सहावा हप्ता) जमा झाला कि नाहीत. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे. किती हप्ते मिळाले नाहीत. आणि जर हप्ता मिळाला नसेल तर यासाठी काय अडचण आहे. अशा प्रकारचे सर्व माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळते.
येथे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसते. फक्त जमा झाला आहे किंवा नाही अशा प्रकारचे सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळते आणि अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतात. आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.