राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून, हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh Forecast) यांनी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या माहितीनुसार, ७ जुलै ते ११ जुलै या कालावधीत राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टीत भाग बदलत मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना मोठा आधार मिळेल, असे डख यांनी म्हटले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता:
७, ८, ९ आणि १० जुलै रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे:
- पूर्व विदर्भ: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ.
- पश्चिम विदर्भ: अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा.
या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता पंजाब डख यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यासाठीही विशेष सूचना आहे:
- नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात होईल, ज्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळेल.
- लातूर, धाराशिव, बार्शी, नगर या जिल्ह्यांमध्ये मात्र ७, ८, ९ आणि १० जुलै रोजी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल, असे डख यांनी सांगितले आहे.
सध्याचा पाऊस कधी थांबणार?
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, ७ ते ११ जुलै या काळात राज्यात सर्वत्र भाग बदलत मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळेल. हा पाऊस ११ जुलै रोजी उघडेल आणि त्यानंतर सूर्यदर्शन होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पुन्हा कधी बरसणार मुसळधार पाऊस?
सध्याच्या पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ ते ३० जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. मात्र, यावेळी पावसाचा जोर विदर्भात नसून, दक्षिण महाराष्ट्रात जास्त बरसेल, असे पंजाब डख यांनी म्हटले आहे.
शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी हवामानाच्या या अंदाजानुसार योग्य ती काळजी घ्यावी आणि आपल्या शेती कामांचे नियोजन करावे.