पिकविमा अपडेट (Pikvima Update): यंदाच्या वर्षी लाखो शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामागे एक महत्त्वाचे कारण असून, ते म्हणजे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी अँग्रीस्टक योजनेंतर्गत ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केले असले तरी, काही शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत, तर काहींनी अद्याप यासाठी नोंदणीच केलेली नाही.
शेतकऱ्यांनी केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढले संकट
फार्मर आयडी बनवताना अनेक शेतकऱ्यांकडून काही चुका झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत:
- काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवताना मोबाईल नंबर चुकीचा टाकला आहे.
- अनेक शेतकऱ्यांचे इतर गट नंबर जोडायचे राहिले आहेत.
- काही शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त गावांमध्ये शेतजमीन आहे, परंतु त्यांनी ती पूर्णपणे जोडलेली नाही.
अशा विविध त्रुटींमुळे, फार्मर आयडी तयार करूनही अनेक शेतकऱ्यांना यंदा पिकविमा भरता येत नाहीये. परिणामी, त्यांना पिकविम्यापासून वंचित राहावे लागण्याची भीती आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित राहावे लागेल?
- ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये एकापेक्षा जास्त गट नंबर किंवा गावांमध्ये असलेली जमीन योग्यरित्या जोडलेली नाही.
- ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवताना मोबाईल नंबर चुकीचा दिला आहे.
- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या अनेक शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांना यंदा पिकविमा तसेच शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.
फार्मर आयडीचे महत्त्व आणि त्याचे फायदे
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख पटवणे शक्य होणार आहे. यामुळे खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देता येईल, ज्यामुळे बनावटगिरीला आळा बसेल. या प्रणालीमुळे राज्य सरकारच्या निधीची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
त्यामुळे, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी अपडेट करून घ्यावेत आणि ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी. अन्यथा, यंदाच्या पिकविम्यासोबतच नमो शेतकरी योजना आणि इतरही अनेक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.