नमस्कार शेतकरी बांधवांनो! पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २० वा हप्ता कधी जमा होणार, याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत, तर काही भागांत दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत, निदान दोन हजार रुपयांचा आर्थिक आधार मिळेल या आशेने शेतकरी केंद्र सरकारच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
PM Kisan Yojana Installment Date
२० वा हप्ता नेमका कधी जमा होणार?
पूर्वी असा अंदाज होता की, जूनच्या अखेरीस हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, अजूनही तो जमा झालेला नाही. याच दरम्यान, एक महत्त्वाची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै रोजी बिहारच्या मोतीहारी येथे एका सभेला उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी डिजिटल माध्यमातून पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.
तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? अशा पद्धतीने चेक करा
तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत (Beneficiary List) आहे की नाहीत, हे तपासणं खूप सोपं आहे. खालील सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही हे तपासू शकतात:
- सर्वात आधी https://pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होम पेजवर तुम्हाला ‘Farmer Corner’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता ‘Beneficiary List’ हा पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक दिलेल्या जागेत अचूक टाका.
- त्यानंतर ‘Get Data’ या बटणावर क्लिक करून तुमचं स्टेटस तपासावे.
जर तुमचं ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झालं असेल आणि तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक (Aadhaar-linked bank account) असेल, तर तुम्हाला हप्त्याची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. या प्रक्रियेत काही अडचण आल्यास, शेतकरी खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकतात:
- PM-KISAN हेल्पलाईन: 1800-115-5525
- इतर हेल्पलाईन: 155261 / 011-24300606
एकाच कुटुंबातील एकालाच लाभ
केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. या बदलानुसार, एका कुटुंबातील (पती, पत्नी, मुलगा, मुलगी) फक्त एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो. इतर सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे योजनेतील फसवणूक टाळून खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.
तुमचा हप्ता कधी जमा होतो आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळतो का, हे वेळोवेळी वेबसाइटवर तपासत राहा. योग्य कागदपत्रे आणि अद्ययावत माहिती असल्यास तुमचा हप्ता खात्यात वेळेवर जमा होईल.