Pm Surya Ghar Yojana: विजेचा खर्च कमी करा, सोलर पॅनल लावा आणि मिळवा सरकारी अनुदान आणि कर्ज!

By Bhimraj Pikwane

Published on:

Pm Surya Ghar Yojana

Pm Surya Ghar Yojana: मोदी सरकारने देशभरातील नागरिकांसाठी एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ (Pm Surya Ghar Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन या योजनेद्वारे देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनेल बसवण्यास अर्थसाहाय्य करणार आहे. एक किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंतच्या वेगवेगळ्या आकारमानांच्या सोलर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

Roof Top Solar Yojana: किती अनुदान मिळणार

एका किलोवॅटच्या सोलर पॅनेलसाठी 30,000 रुपये, दोन किलोवॅटसाठी 60,000 रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक आणि 10 किलोवॅट पर्यंतच्या सोलर पॅनेलसाठी 78,000 रुपये अनुदान मिळणार आहे.

Pm Surya Ghar Yojana: येथे करा ऑनलाइन अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना pmsuryaghar.gov.in या शासकीय वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक असून त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांचे पालन करावे लागेल.

अर्ज मंजूर झाल्यानंतर विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसविण्यात येईल. पॅनेल बसवून नेट मीटर बसविल्यानंतर कमिशनिंग प्रमाणपत्र मिळेल आणि अनुदानाची रक्कम 30 दिवसांत बँक खात्यात जमा होईल.

Solar Yojana: कर्ज हि मिळणार

वेगळी सोयीस्कर बाब म्हणजे आता सोलर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानाबरोबरच कर्जही मिळणार आहे. तीन किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनेलसाठी कोणतीही हमी न देता कर्ज मिळेल. हा कर्ज सरकारी बँकेकडून 7 टक्के व्याजदराने मिळेल.

अशा प्रकारे मोदी सरकारने देशभरातील नागरिकांना सौरउर्जेकडे वळण्याचा मार्ग सोपा केला आहे. या योजनेमुळे एकीकडे लोकांना मोफत वीज मिळणार असली तरी दुसरीकडे देशात सौरउर्जेचा वापर वाढणार आहे आणि पारंपारिक इंधनांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

हे देखील वाचा : Mahavitaran Solar Pump Yojana : महावितरण कडून 2 लाख सोलार पंपासाठी नवीन ऑनलाइन अर्ज सुरु, असा करा ऑनलाइन अर्ज

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

1 thought on “Pm Surya Ghar Yojana: विजेचा खर्च कमी करा, सोलर पॅनल लावा आणि मिळवा सरकारी अनुदान आणि कर्ज!”

Leave a Comment