Ration card e KYC: रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे; आता लाभार्थ्यांना स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये न जाता काही मिनिटांमध्ये स्वतःच्या घरी बसून आपल्या मोबाईल वरती इ केवायसी पूर्ण करता येणार आहेत.
सरकारने सर्वच शिधापत्रिका धारकांनाही केवळ शिकवणे बंधनकारक केले आहेत. स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये जाऊन ईपॉस मशीनच्या द्वारे मोफत इ केवायसी केली जात आहे. परंतु लहान मुले आणि तसेच वृद्ध लोकांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅनिंग करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असल्याचे देखील पाहायला मिळतं आहे.
अशातच, सरकारने मेरा ई केवायसी आप कार्यरत केलेले असून आता लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये न जाता काही मिनिटांमध्ये स्वतःचे कुटुंबाचे ईकेवायसी पूर्ण करता येणार आहेत.
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना घरबसल्या काही मिनिटांमध्ये आपली केवायसी पूर्ण करता येणार आहेत. राज्य सरकारने एन आय सी च्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या विविध सोयीसाठी मेरा ई केवायसी ॲप सुरू केलेले आहेत. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष स्वस्त धन्य दुकानांमध्ये न जाता घरबसल्याही केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत.
ई-केवायसी कशी करावी? (step-by-step मार्गदर्शन)
१) प्ले स्टोअरवरून खालील दोन ॲप डाउनलोड करावे.
अ) mera e-kyc mobile app खालील लिंकवरून डाउनलोड करा.https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
ब) Aadhaar Face RD Service App खालील लिंकवरून डाउनलोड करा करा.https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
२) ॲप इन्स्टॉल करून सेटअप करा.दोन्ही ॲप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्यावी लागते.
३) Mera E-KYC ॲप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.- राज्य : महाराष्ट्र निवडा.- आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करावे.- कॅप्चर : दिलेल्या कोडची नोंद करावीत.
४) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)- स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.- स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करावी.- दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरावे.
५) सत्यापन पूर्ण- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसते.- याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये “E-KYC Status” तपासावे.- जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झालेली आहेत.
अत्यंत महत्त्वाचे- ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.- महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा.- शेवटची तारीख : 30 एप्रिल २०२५