व्हॉट्सॲप ग्रुप 👉                   
                        Telegram Group Join 👉                             येथे क्लिक करा            

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार; नद्यांना पूर, व्हिडिओ व्हायरल!

रत्नागिरी, १५ जुलै २०२५: सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेले आहेत. जिल्ह्याच्या बहुतांशी सर्वच तालुक्यांमध्ये कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने अनेक गावांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरलेले आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश जारी केले आहे.


नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, बाजारपेठांमध्ये पाणी

गेले काही दिवस तुरळक पावसाची नोंद असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केलेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोनवी, जगबुडी, शास्त्री, अर्जुना आणि कोदवली या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहेत.

  • खेड तालुक्यातील जगबुडी नदी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहे.
  • याशिवाय, वाशिष्ठी, काजळी आणि मुचकुंदा नद्यांच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झालेली आहे.
  • रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, हरचेरी आणि चांदेराई बाजारपेठ परिसरात नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची धावपळ उडालेली आहे.

राजापूर, चिपळूण, खेड आणि संगमेश्वरमध्ये गंभीर स्थिती

मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे:

  • राजापूर येथील कोदवली आणि मुचकुंदा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापूर शहर बाजारपेठेत आणि आसपासच्या परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
  • लांजा येथील अर्जुना नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजार परिसरात नद्यांचे पाणी ओसंडून वाहत असल्याने सकाळपासून बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली. बाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित हलवण्यासाठी धावपळ सुरू केली.
  • या भागातील मराठी शाळा, अंगणवाडी आणि कोंड-असुर्डे मार्ग पूर्णपणे बंद झाले असून, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.
  • संगमेश्वर-देवरुख मार्गावरील लोवले येथे पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली, तर संगमेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांच्या बुरंबी येथे रांगा लागल्या.
  • लांजा तालुक्यातील आंजणारीतील श्री दत्त भवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. काजळी नदीला पूर आल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
  • चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने वाशिष्ठीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चिपळूण शहर भागात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  • खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खेड बाजारपेठेत पाण्यात अडकलेल्या एका दुचाकीस्वार महिलेला स्थानिक नागरिकांनी यशस्वीरित्या वाचवले.
  • मंडणगड तालुक्यालाही पावसाने चांगलेच झोडपल्याने येथील शासकीय विश्रामगृह आणि एसटी आगार भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत, प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. खेड-कशेडी मार्गावरील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे थांबली होती.

जिल्ह्यात मंगळवार रात्रीपर्यंत संततधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच, पूरग्रस्त भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळत आहे: असा करा ऑनलाईन अर्ज! Bank Of Maharashtra Personal Loan

Leave a Comment