RBI On PayTM : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम बँकेला दणका दिला आहे. पेटीएम बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. आरबीआयने 31 जानेवारीला हा आदेश जारी केला होता. याशिवाय, विद्यमान ग्राहकांना 29 फेब्रुवारीनंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासही मनाई करण्यात आली आहे. RBI On PayTM Bank
आरबीआयने दिलेल्या माहितीच्या आधारे, सिस्टम ऑडिट अहवाल आणि त्यानंतरच्या अहवालातून असे दिसून आले की कंपनीने सातत्याने आरबीआय नियमांचे उल्लंघन केले आहे. याशिवाय पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर समस्याही समोर आल्या असून, रिझर्व्ह बँकेने भविष्यात पुढील आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
RBI On PayTM: सध्याच्या पेटीएम बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम?
29 फेब्रुवारी 2024 नंतर प्रीपेड सेवा, वॉलेट, FASTag, NCMC कार्ड इत्यादींसह कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात कोणत्याही ठेवी, रिचार्ज, क्रेडिट व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही. तथापि, आरबीआयने असेही स्पष्ट केले की जमा झालेले व्याज, कॅशबॅक किंवा इतर परतावे ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील.
RBI On PayTM: यापूर्वीही KYC न केल्याने कारवाई
दरम्यान, पेटीएम बँकेवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी पेटीएम बँकेवरही कारवाई केली होती. तीन महिन्यांपूर्वी, पेटीएमला केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा दंड ठोठावला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला 539 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने यापूर्वी 2021 मध्ये पेटीएम बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी पेटीएमवर काही नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. दोन वर्षांनंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर कारवाईसाठी पुन्हा एकदा उंबरठा वाढवला आहे.