Rooftop Solar Panel घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज

By Bhimraj Pikwane

Published on:

Rooftop Solar Panel : सध्या देशात विजेचे संकट गंभीर बनले आहे. एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे. मात्र दुसरीकडे सध्या विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. विजेचे उत्पादन कमी व मागणी जास्त वाढल्याने वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून या वीज संकटावर सहज मात करू शकता. तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून त्याच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करू शकता. सोलर पॅनलपासून निर्माण होणारी ही वीज तुमची गरज पूर्ण करू शकते. सरकारकडून देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी मदत केली जात आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येते? केंद्र सरकार त्यासाठी किती अनुदान देते, सोलर पॅनच्या माध्यमातून तुम्ही किती प्रमाणात विजेची निर्मिती करू शकता, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वात प्रथम विजेची गरज निश्चित करा

म्हणजे तुम्हाला एका दिवसांत किती वीज लागू शकते. तुमच्याकडे किती विद्युत उपकरणे आहेत यावरून तुम्ही तुम्हाला दिवसभरात किती विजेची गरज लागणार आहे हे निश्चित करू शकता. समजा तुमच्याकडे दोन ते तीन फॅन, एक फ्रिज, सहा ते सात एलईडी बल्ब आणि टीव्ही एवढी विद्युत उपकरणे असल्यास तुम्हाला दिवसभरात 6 ते 8 युनिट एवढी वीज लागू शकते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरावर बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची किंमत निश्चित करू शकता.

केंद्र सरकारकडून अनुदान Solar Panel Yojana :-
केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक ऊर्जास्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून सोलर रूफ टॉप योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या डीलरकडून सोलर पॅनल खरेदी करून ते तुमच्या घरावर बसवा. त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा. तुम्ही जर तुमच्या घरावर तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला सरकार चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देते. तुम्ही जर तुमच्या घरावर दहा किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला त्यावर वीस टक्के सबसीडी देण्यात येते.

सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो

जर तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजारांच्या जवळपास खर्च येतो. मात्र त्यावर तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसीडी मिळते. म्हणजेच तुम्हाला दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टीमसाठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील 25 वर्ष तुमची वीजबिलापासून सुटका होऊ शकते. तसेच तुमच्या घरात चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते.

अनुदानासाठी अर्ज कसा कराल?

तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅन लावल्यानंतर अनुदानासाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे अप्लाय फॉर सोलर पॅनल या पर्यावर क्लिक करा. तिथे एक नवीन पेज ओपन हेईल. या पेजमध्ये तुमच्या सोलर पॅनलबाबत आवश्यक ती माहिती भरा. तुम्ही अर्ज केल्यानंतर महिना भराच्या आत तुमचे अनुदान बँकेत जमा होते Rooftop Solar Panel.

 

➡️➡️ येथे क्लिक करून अर्ज करा ⬅️⬅️

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

1 thought on “Rooftop Solar Panel घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज”

Leave a Comment