Rooftop Solar Subsidy: घरावर बसवा सोलर पॅनेल, मिळवा 300 युनिट्स मोफत वीज!

Rooftop Solar Subsidy: महाराष्ट्रासह देशभरातील वीज ग्राहकांना आता रुफटॉप सोलर सिस्टिम बसवून मोफत वीज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर’ या मोफत वीज योजनेंतर्गत घरांच्या छपरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून ग्राहकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून प्रति घर ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी महावितरणकडे केली आहे.

Rooftop Solar Subsidy Yojana

गरजेनुसार एक ते तीन किलोवॉट क्षमतेची रुफटॉप सोलर सिस्टिम बसवता येईल. एक किलोवॉट क्षमतेच्या सिस्टिमसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळेल. एका घरासाठी जास्तीत जास्त ७८ हजार रुपये अनुदान मिळेल.

रुफटॉप सोलर सिस्टिममधून तयार होणारी वीज ग्राहकांच्या घरातच वापरली जाईल. दररोज सरासरी एक किलोवॉट क्षमतेमधून ४ युनिट वीज तयार होते. महिन्याला सरासरी १२० युनिट वीज तयार होऊ शकते. दरमहा १५० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरेल. २०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना तीन किलोवॉटची सिस्टिम आवश्यक ठरेल.

Rooftop Solar Subsidy Yojana Maharashtra

गरजेपेक्षा अधिक वीज तयार झाल्यास ती महावितरणला विकता येईल. वीजबिल शून्य येईल आणि जादा वीज विकल्याने उत्पन्नही मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी ( Rooftop Solar Website) https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल किंवा ‘पीएम सूर्यघर’ मोबाईल अ‍ॅप वापरावा लागेल.

देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रुफटॉप सोलर (Rooftop Solar Yojana) सिस्टिममुळे वीज खर्च कमी होईल

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment