Unseasonal Rain Maharashtra: राज्यात गेल्या आठवड्याच्या शेवटी सुरू झालेला अवकाळी पाऊस सुरूच आहे. राज्यात गारपिटीमुळे मोठे नुकसान होत असताना अवकाळी हवामानाचा कालावधी पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अवकाळी पावसाचे संकट 15 एप्रिलपर्यंत राहणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज पूर्व विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
Unseasonal Rain Maharashtra
भारतीय हवामान खात्यानेही शुक्रवारी महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला. येत्या २४ तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी, यवतमाळ, वाशीम, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
काही भागात हलक्या सरींची अपेक्षा आहे. दरम्यान, राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात 1.5 किमी उंचीचे चक्रीवादळ वारे वाहत होते. तर दक्षिण-पूर्व राजस्थान ते गुजरात, कोकण, कर्नाटक किनारपट्टीवर चक्रीवादळ वाऱ्यांसह कमी दाब सक्रिय आहे. Unseasonal Rain Maharashtra
12 पास बेरोजगार विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत मिळणार 5000 रुपये, येथे करा अर्ज
या भागात ऑरेंज अलर्ट व यलो अलर्ट
बुधवारी रात्रीनंतर बीड, अकोला, बुलडाणा, परभणी आदी भागात जोरदार पाऊस झाला. नागपुरात गुरुवारी पाऊस झाला. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ झाले. अवकाळी पावसामुळे विदर्भातील कमाल तापमानात घसरण सुरूच आहे. आज, शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.