New Pay Commission: सध्या संपूर्ण देशभरात सातव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार आणि केंद्र सरकार आहे राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना आता आठवा वेतन लागू करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने हा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू केला होता. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत असे दिसून आले आहे की, दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. त्यामुळे आठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होईल असे अपेक्षित आहे.
परंतु त्यासाठी आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन करावी लागेल.जर यावर्षीच राज्य सरकारने ही समिती स्थापन केली तर पुढील येणाऱ्या आठव्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात लागू करण्यात येणार. त्यामुळे सरकार केव्हा या आठव्या वेतन आयोगाचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी कारण राज्यातील जुनी विद्यापीठ नागपूर येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा सुधारित वेतन लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. Employees Salary Hike
नवीन वेतन आयोग लागू (New Pay Commission)
या संस्थेतील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत पाचवा वेतन आयोग लागू होता. परंतु आता त्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. खरे तर या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची शिफारस लागू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू होता. त्यानुसार आता श्रमिक विद्यापीठ नागपूर येथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय 18 मार्च 2024 रोजी काढण्यात आला आहे. (Employees News Pay Commission)
या निर्णयानुसार, श्रमिक विद्यापीठातील एक जानेवारी 2006 पासून कार्यरत असलेल्या आणि त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अधीक्षक/लेखापाल, लघुटंकलेखक आणि शिपाई या संवर्गांतील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.
New Pay Commission: काय लाभ मिळणार
सध्या अधीक्षक/लेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार 5000-8000 ही वेतनश्रेणी लागू होती. पण आता त्यांना 9300-34800 ग्रेडपे 4200 ही नवीन वेतनश्रेणी (New Pay Scale) लागू होणार आहे. लघुटंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगात 4000-6000 ही वेतनश्रेणी होती. पण आता त्यांना 5200-20200 ग्रेडपे 2400 ही नवीन वेतनश्रेणी लागू होणार आहे. शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगात 2550-3200 ही वेतनश्रेणी होती. पण आता त्यांना 4440-7440 ग्रेडपे 1300 ही नवीन सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
या निर्णयामुळे या संस्थेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देखील मिळणार आहे.
हे वाचलंय का?