Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान बदलले असून, दिवसा उष्णतेनंतर अचानक आकाशात ढग जमा झाले आणि रात्री पाऊस झाला. हलक्या पावसाने रहिवाशांना उन्हापासून दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, येत्या ३ ते ४ दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट आणि मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने (Maharashtra Weather Update) दिला आहे.
हवामान खात्याने (IMD) पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सर्वसामान्यांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
RTE 25% Admission: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार! शासकीय शाळांसाठी आरटीईचा अर्ज कशाला?
त्यामुळे वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील तीन दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येईल, असा अंदाज आहे. चार दिवसांपर्यंत.
कुठे असणार पाऊस Maharashtra Weather Update
हवामान अंदाजानुसार, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल.
हवामान अंदाजानुसार, सोमवारी मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही हलक्या सरींची अपेक्षा आहे. दरम्यान, मंगळवारीही मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.