Ladki Bahin Yojana March Installment : महिला दिनाच्या पूर्वी संधीला लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात आलेले आहे जागतिक महिला दिनापूर्वसंध्येला 1500 रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले होते परंतु लाडक्या बहिणींमध्ये नाराजी असल्याचे सध समोर आलेले आहे. मार्च महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार होते. परंतु त्याऐवजी एकच हप्ता कसा मिळाला याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
काही महिलांच्या बँक खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले आहेत. अशा महिलांना 12 मार्चपर्यंत अजून एकदा पंधराशे रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये हे महिलांच्या बँक खात्यावर दोन टप्प्यांमध्ये जमा करण्यात येत आहेत. अशी माहिती नुकतीच आदिती तटकरे यांनी बोलताना दिलेली आहे.
Ladki Bahin Yojana March Installment
राज्यभरातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. 7 मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये येऊ लागल्याने हा आनंद फक्त काही काळच टिकला. महिलांना बँक खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत. अशी अपेक्षा होती परंतु राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दोन महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात महिलांच्या खात्यामध्ये एकच हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत.
( Note: मोबाईलच्या अर्ध्या स्क्रीनच्या वर व्हिडिओ पाहावा; खाली व्हिडिओ प्ले होत नाही)
राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे महिलांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचे खात्यावर तीन हजार रुपये येणार अशी सर्व राज्यभरातील महिलांना अपेक्षा होती पण पंधराशे रुपये आलेली आहेत. असे महिलांनी न्यूज चैनल सोबत बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे.
लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यभरामधील लाडक्या बहिणीने 2100 रुपये अनुदान हे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील देण्याच्या घोषणेपासून सरकारने घुमजाव केलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक विषय रुपये देण्याचा आश्वासन कधीच दिलं नसल्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र लागलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली लाडकी बहिणी योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली असल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले होते. राज्यात पुन्हा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये दिले जाणार असाश्वसन देखील माहितीच्या सर्व नेत्यांनी दिलेलं होतं. मागील अधिवेशनामध्ये तर महिला आणि बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात एक विषय रुपया संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती देखील दिलेली होती. मात्र आता यावरून सरकारने टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळते आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. आणि तो जाहीरनामा पाच वर्षांसाठी सरकारने केला असल्याचे देखील त्यांनी जाहीर केलेले आहे.