Petrol Diesel Price l सध्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे. भारतात कच्च्या तेलाच्या आयात दरात गेल्या ५ वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आलेली आहे. परिणामी, लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Cut) किमतीत कपात होणार असल्याची माहिती नुकतीच पुढे येत आहे.
प्रति बॅरल दर 70 डॉलरच्या खाली :
सध्या भारतात कच्च्या तेलाची सरासरी आयात किंमत प्रति बॅरल 69.39 डॉलर इतकी आहेत, जी 2021 नंतरची गेल्या पाच वर्षांमधील सर्वात कमी किंमत मानली जात आहेत. मागील वर्षी एप्रिलमध्ये हीच किंमत 89.44 डॉलर पाहायला मिळालेली होती, म्हणजेच एका वर्षात तब्बल 22% घट नोंदवण्यात आलेली आहेत.(Petrol Diesel Price Cut)
जागतिक मंदी, ट्रेड वॉरचे तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या जागतिक मागणीत घट झालेली आहेत. त्यामुळे पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता एचटी आणि रॉयटर्सच्या अहवालांमध्ये वर्तवण्यात आलेली आहेत.
भारतातील स्थिती आणि संभाव्य परिणाम :
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 87% तेल आयात करत आहेत. शुद्धीकरण उद्योगात याच कच्च्या तेलाचा 90% खर्चाचा वाटा असतो. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरल्यास, याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर होऊ शकतो.
Goldman Sachs ने 2025 मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत 63 डॉलर प्रति बॅरल राहणार आहेत, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने सुद्धा मागणी घटण्याचा इशारा दिला आहेत.
यामुळेच लवकरच पुढील कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गेल्या पाच वर्षांमधील सर्वात मोठी घसरण होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.