भारताने पाकिस्तानला मोठा दणका; ज्यामुळे पाकिस्तान होईल बेहाल! भारताने स्थगित केलेला सिंधू पाणी करार रद्द

Indus Waters Treaty | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतलेली असून, 1960 चा ऐतिहासिक सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठ्या पातळीवर आर्थिक, शेती आणि जलविद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहेत.

सिंधू करार नेमका काय आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये झालेला सिंधू पाणी करार हा दोन्ही देशांच्या पाण्याच्या वाटपाचा करार आहेत. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्या नेतृत्वाखाली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झालेला होता. या करारानुसार भारताला पूर्वेकडील नद्या – रावी, बियास आणि सतलज – यांचे पाणी पूर्णतः वापरण्याचा अधिकार मिळालेला होता, तर पश्चिमेकडील नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाब – यांचा वापर पाकिस्तानला देण्यात आला होता.

भारताला या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याची मुभा देखील होती, मात्र पाकिस्तानकडून वेळोवेळी भारताच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय मंचांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तरीही भारताने हा करार 6 दशकांहून अधिक काळ पाळलेला होता.

गाडी चालकांना नवीन दंड लागणार, नवीन दंडाचे दर पहा; नवे नियम जाहीर RTO Motor Vehicle 2025
गाडी चालकांना नवीन दंड लागणार, नवीन दंडाचे दर पहा; नवे नियम जाहीर RTO Motor Vehicle 2025

हल्ल्यानंतर कठोर निर्णय

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे TRF (The Resistance Front) या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीत सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

पाकिस्तानवर होणारे संभाव्य परिणाम

पाकिस्तानमधील जवळपास 80 टक्के शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर आधारित आहेत. याच नद्यांवर अनेक जलविद्युत प्रकल्पही कार्यरत आहे. भारताने करार थांबवल्यास पाणी आणि वीज दोन्हींच्या टंचाईमुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसणार आहेत.

सिंधू करारासारखा आंतरराष्ट्रीय करार थांबवण्याचा निर्णय हे भारताचे स्पष्ट संकेत आहेत की, आता फक्त निषेध नव्हे तर कृती केली जणार. पाकिस्तानने वेळोवेळी भारताच्या संयमाचा गैरफायदा घेतला आहे आणि आता या निर्णयामुळे पाकिस्तानचं “तोंडचं पाणी”  प्रत्यक्षात जाणार आहेत.

नुसकान भरपाई मंजूर; जिल्हा निहाय संपूर्ण यादी येथे पहा  Nuskan Bharpai List
नुसकान भरपाई मंजूर; जिल्हा निहाय संपूर्ण यादी येथे पहा  Nuskan Bharpai List

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI