Ladki Bahin Yojana | नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) सरकारसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बद्दल (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) पसरलेल्या गैरसमजांवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी नुकतेच स्पष्टीकरण दिलेले आहे. ही योजना बंद होणार नसून, पात्र महिलांना तिचा लाभ मिळत राहणार आहे, असे त्यांनी पुण्यात (Pune) बोलताना सांगितलेले आहे.
“या महिलांसाठी“ लाडकी बहीण योजना बंद होणार?
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या लाडक्या बहिणी लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. किंवा ज्या महिलांनी अपात्र असताना देखील खोटे कागदपत्राचा वापर करून लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळवलेला आहे. अशा लाडक्या बहिणींना आता वगळण्यात येणार आहे आणि यांच्यासाठी या योजनेचा बंद होणार आहे.
राज्यभरातील ज्या महिला लाडके बहिणीचे निकष पूर्ण करत नाहीत. परंतु अशा ज्या महिलांना लाभ मिळत होता. त्यांना देखील यापुढे लाभ मिळणार नाही.
आणि ज्या महिलांना शेतकरी योजनेचा लाभ मिळवत आहेत. अशा महिला लाडक्या बहिणी योजनेमधील पूर्णपणे बंद न करता केवळ 500 रुपये महिना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कारण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 1000 रुपये मिळत आहेत.
योजनेची पात्रता आणि अपात्रतेचे निकष स्पष्ट केले
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे, तसेच विरोधकांकडूनही या योजनेवरून सरकारवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर, मंत्री आदिती तटकरे म्हणालेल्या, “मला वाटते योजनेबद्दल गैरसमज करून घेतला गेला आहे.” त्यांनी योजनेच्या निकषांबद्दल अधिक स्पष्टता आणलेली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहेत.
तसेच, ज्या महिला ‘संजय गांधी निराधार योजने’चा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ घेत आहे, त्या ‘लाडकी बहीण योजने’साठी पात्र ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलेले. काही महिला सुरुवातीला योजनेत बसत नसतानाही त्यांना लाभ मिळालेला होता, मात्र आता अशा अपात्र अर्जांवर कारवाई होत असल्याचे त्यांनी सूचित केलेले आहे.
लाडकी बहिणी योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
नमो शेतकरी योजनेशी संलग्नता असणाऱ्या लाडक्या बहिणी
आदिती तटकरे यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वाचा पैलू उलगडलेला आहे. ‘नमो शेतकरी योजने’तून (Namo Shetkari Yojana) ज्या महिला शेतकऱ्यांना १००० रुपये मिळतात, त्यांना एकूण १५०० रुपये लाभ मिळावा यासाठी ‘लाडकी बहीण योजने’तून अतिरिक्त ५०० रुपये दिले जात आहे. हा शासनाचा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे.
सध्या राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहे, जी संख्या आधी २ कोटी ३३ लाख होती. यावरून पात्र महिलांची संख्या वाढत असल्याचे आणि त्यांना लाभ मिळत असल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकारने (देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar)) निवडणुकीतील यशाचे श्रेय राज्यातील महिलांना दिलेले होते आणि ही योजना सुरूच राहील, असे आश्वासन त्यांनी दिलेले.