Ladki Bahin Yojana Web Portal: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज कसा करावा?

Ladki Bahin Yojana Web Portal: राज्य सरकारने अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी सरकारने नवे वेबपोर्टल सुरू केले आहे, ज्यामुळे महिलांना घरबसल्या अर्ज करणे सोपे झाले आहे. या लेखात आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana Web Portal


अर्ज कसा करायचा? Ladki Bahin Yojana Web Portal


1. वेबपोर्टलवर लॉगिन कसे करावे?

Ladki Bahin Yojana Web Portal (Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Link Official Website)

  • सर्वप्रथम, [मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबपोर्टल]https://ladakibahin.maharashtra.gov.in लिंकवर क्लिक करा.
  • पोर्टल ओपन झाल्यावर, मुख्य मेनूमध्ये ‘अर्जदार लॉगिन’ मेनूवर क्लिक करा.
  • नंतर ‘Create Account’ वर क्लिक करून आवश्यक तपशील आणि कॅप्चा कोड टाका. ‘Signup’ क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP टाका आणि ‘Verify OTP’ वर क्लिक करा.

2. अर्ज प्रक्रिया:

  • लॉगिन झाल्यानंतर, ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज’ या मुख्य मेनूवर क्लिक करा.
  • आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकून ‘Validate Aadhar’ वर क्लिक करा.
  • अर्जामध्ये महिलेचे संपूर्ण नाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, पत्ता, वैवाहिक स्थिती, आणि इतर तपशील भरा.
  • अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील भरा.



3. आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
  • हमीपत्र डाऊनलोड करून प्रिंट काढून सही करा आणि पुन्हा अपलोड करा.
  • सर्व माहिती योग्यरित्या भरल्यावर ‘Submit’ वर क्लिक करा.
Ladki Bahin Yojana Web Portal: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज कसा करावा?

Mazi Ladki Bahin Yojana List: माझी लाडकी बहीण योजना 2024 यादी जाहीर. ऑनलाईन नाव कसं तपासायचं, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अधिक माहिती

4. अर्जाची सद्यस्थिती तपासा:

अर्ज सबमिट केल्यानंतर, ‘यापूर्वी केलेले अर्ज’ या पर्यायावर क्लिक करून अर्जाची सद्यस्थिती (Status) जाणून घ्या.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड
  • हमीपत्र (अर्जामध्ये अपलोड करण्यासाठी)
  • अर्जदाराचा फोटो

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Leave a Comment