Vinay Narwal | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल (Vinay Narwal) यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि तो विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा शेवटचा क्षण असल्याचा दावा केलेला होता. मात्र, आता या व्हिडिओबाबत खळबळजनक माहिती समोर आलेली आहेत.
व्हिडिओतील कपलचे नवे स्पष्टीकरण –
सध्या सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ विनय नरवाल यांचा नसून, तो यशिका शर्मा आणि तिचा पती आशिष सेहरावत यांचा आहेत, असं स्वतः त्या दोघांनी स्पष्ट केलं आहेत. “आम्ही जिवंत आहोत” असं या कपलने म्हटलंय. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे, “जो व्हिडिओ सध्या विनय नरवाल यांच्याशी जोडला जात आहेत, तो आमचा आहे. कृपया कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका.”
पुढे ते म्हणाले की, “आम्ही पोस्ट केलेला व्हिडिओ आमचाच होता, पण त्याचा गैरवापर केलेला गेला आहे. अनेक फेसबुक पेजेस, इंस्टाग्राम अकाउंट्स आणि अगदी काही नामांकित न्यूज चॅनेल्सनीही तो विनय सर आणि त्यांच्या पत्नीचा शेवटचा क्षण असल्याचा दावा करत व्हायरल केलेला आहे. ही गोष्ट आम्हाला अत्यंत दु:खद वाटलीय.” कपलने हे देखील नमूद केलं आहे की , “या चुकीच्या दाव्यांमुळे आम्हाला खूप द्वेषपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या, त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ डिलिट केलेला आहे.”
या चुकीच्या व्हिडिओमुळे विनय नरवाल यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार होण्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यशिका आणि आशिषने त्यांच्या व्हिडीओत लोकांना आवाहन केलं आहेत की, “कृपया जे कोणी आमच्या व्हिडिओचा चुकीचा वापर करत आहे, अशा पेजेसना रिपोर्ट करावे. विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या न्यूज चॅनेल्सनीही अशा प्रकारे अनवेरिफाईड सामग्री शेअर करणं हे अत्यंत धक्कादायक आहेत. अशा गोष्टींमुळे मीडियावरचा विश्वासही ढासळतो आहे.”
फेक व्हिडिओमुळे गोंधळ-
सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल करण्याआधी तिची सत्यता पडताळणे किती महत्त्वाचे आहेत, हे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झालेले आहे. यशिका शर्मा आणि आशिष सेहरावत यांच्या या खुलाशानंतर अनेकांनी संबंधित फेक व्हिडिओ हटवण्याची मागणी केलेली आहेत.
विनय नरवाल यांच्यासारख्या शूर जवानाच्या बलिदानानंतर अशा प्रकारचे दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल होणं अत्यंत खेदजनक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहेत.