Sovereign Gold Bond: सोन्यासारखा पर मिळवायचा असेल तर गुंतवणूक देखील चांगल्या ठिकाणी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. Sovereign Gold Bond Scheme असे या स्कीमचे नाव आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज 15 सप्टेंबर हा शेवटचा दिनांक आहे.
या योजनेअंतर्गत हा दुसरा टप्पा आहे तसेच या योजनेची सुरुवात 11 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सोने बाजारांमधील भावापेक्षा कमी दरामध्ये सोने खरेदी करण्याची संधी नागरिकांना देते. शासन या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची हमी तर देतेच त्यावरून नागरिकांना चांगला मोबदला देखील देते. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पाच दिवस स्वस्त सोने खरेदी ची संधीसाठी (Gold Price Today 15 September 2023) आजचा शेवटचा दिवस आहे.
Sovereign Gold Bond Scheme या योजनेची खास वैशिष्ट्ये
- Sovereign Gold Bond या योजनेच्या माध्यमातून ग्राहक 24 कॅरेट शुद्ध सोने खरेदी करू शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून आपण 99.9% शुद्ध सोन्यामध्ये आपली गुंतवणूक करू शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून वार्षिक व्याज केंद्र सरकार देते.
- ही योजना आठ वर्षासाठी आहे.
- आत्तापर्यंत या योजनेमधून भरपूर सारे ग्राहक मालामाल झालेले आहेत.
- ग्राहक गुंतवणूक करून या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात एक ग्राम ते चार किलो पर्यंत सोने खरेदी करू शकतात.
- योजनेच्या माध्यमातून संस्थांना कमाल मर्यादा 20 किलो सोने खरेदी करण्याची परवानगी आहे.
खरेदी करण्यासाठी असा आहे भाव
केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 2.5 टक्के व्याज देते. या योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन सोने खरेदीवर 50 रुपयापर्यंतची अतिरिक्त सवलत केंद्र सरकार देते. वर्ष 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता सोन्याचा भाव 5923 रुपये असा भाव ठरवण्यात आलेला आहे. ऑनलाइन पद्धतीने सोन्याची खरेदी केल्यास 5873 रुपये प्रति ग्रॅम असा भाव आहे. 500 ग्रॅम एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त खरेदी करू शकतो. तसेच कमीत कमी 1 ग्रॅम करू शकता.
येथे करू शकता खरेदी
सोनेरी खरेदी करण्यासाठी स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) तसेच पोस्ट ऑफिस व स्टॉक एक्सचेंज NSE आणि BSE या ठिकाणावरून आपण खरेदी करू शकता. डिमॅट खात्याचा वापर करून या आधारे आपण स्वस्तामध्ये सोने खरेदी करू शकतात.