अवकाळी पाऊस अजून किती दिवस राहणार: गेल्या चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाने राज्यभर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात तर अनेक भागांमध्ये गारपीट होऊन वादळी वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. आणि हा अवकाळी पाऊस किती दिवस राहणार याबाबत पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवलेला आहे. याविषयी माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
अवकाळी पाऊस अजून किती दिवस राहणार
7 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे. आणि याचा फटका राज्यात बसत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच पूर्व कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसासह वादळी वारे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन पंजाबराव यांनी केलेले आहे.
राज्यामध्ये सध्या कांदा काढणे सुरू आहे. तसेच रब्बी हंगामामधील इतर पिकांची काढणी देखील सुरू आहे. अशा मध्येच अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये देखील 7 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस असल्याचे पंजाबराव डक यांनी सांगितलेले आहे.
7 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आणि सात एप्रिल नंतर वातावरण पूर्ववत अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
11 एप्रिलच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. 7 एप्रिल पर्यंत राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि जनावर निवडलेला बांधली पाहिजेत आणि अवकाळी पाऊस किंवा विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. अशा प्रकारची काळजी घ्यावी अशी आवाहन पंजाबराव डख यांनी केलेले आहे.