पुढील 5 दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा; या भागात मुसळधार पावसाचा अंदाज Weather Update Today

Weather Update Today:  राज्यभरातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसात वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे छायेत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र तसेच पूर्व विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहेत. गेल्या आठवड्याभरात राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भात तसेच कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस सोबत गारपिटीचा इशारा आहे.

Weather Update Today

राज्यभरात सध्या हवामानात बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी ढगाळ वतावरण झालेले आहे. त्यामुळे हवामान खात्याने पूर्व विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

राज्यात या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा

महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात पूर्वी विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसासोबत गारपीटीचा इशारा देण्यात आलेला आहे. यासोबतच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ( Weather Update Today)

मराठवाड्यामधील बीड जालना संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तापमान बदल होऊन पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच लातूर नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

पुढील 5 दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

Leave a Comment