महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; कुठे करावं लागणार अर्ज? पहा Free Flour Mill Scheme

Free Flour Mill Scheme: महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळे योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, निराधार, अशा गरजवंत लोकांसाठी सरकारकडून अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि महिलांसाठी देखील अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज कुठे करायचा? मोफत पिठाची गिरणी साठी कोणते कागदपत्रे लागतात? पिठाच्या गिरणी साठी किती अनुदान मिळते? लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागतात? अशी सर्व माहिती आपण या पोस्ट माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महिलांना आर्थिकदष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने अनुदानावर पिठाची गिरणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली असून आपण सर्व सविस्तर माहिती पाहूयात.

या मोफत पिठाची योजनेच्या माध्यमातून भरीव अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे महिलांना गावांमध्येच राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

किती अनुदान मिळते?

पिठाची गिरणी योजनेच्या माध्यमातून महिलांना 90 टक्के एवढे अनुदान देण्यात येत आहे. अशी माहिती सर्व प्रसार माध्यमांमध्ये दिसत आहे. आणि उर्वरित 10 टक्के रक्कम ही लाभार्थ्यांना भरावी लागते.

योजनेच्या पात्रता काय आहेत?

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र मधील 18 ते 60 वयोगटांमध्ये महिलांना दिला जात आहे. तसेच राज्यभरातील सर्वच महिलांना याचा लाभ मिळत नाही तर SC म्हणजेच शेड्युल कास्ट आणि ST म्हणजे शेड्युलर म्हणजे ( अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती)  यांच्या या दोन प्रवर्गासाठी महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत आहे.

महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; कुठे करावं लागणार अर्ज? युट्यूब व्हिडीओ

या योजनेचा लाभ हा वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबामधील महिलांना मिळतो आहे. ज्या महिलांच्या नावाने अर्ज सादर करण्यात आलेला आहे. तिचे बँक खाते असणे आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे ही महिला ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

ज्या महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांना स्वतःचे आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो, गिरणी खरेदी करण्यासाठी शासन विकली त्यांचे कोटेशन अशी महत्वाची माहिती लागणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

या योजनेच्या माध्यमातून महिलांना ऑफलाइन अर्ज करावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बाल विभागाच्या कार्यालयांमध्ये इच्छुक अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करत असताना सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे बंधनकारक आहे.

अर्ज हा विहीत नमुन्यात सादर करावा लागत असतो. आणि अर्ज काळजीपूर्वक भरून सादर करावा. संबंधित कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज प्रक्रिया पार पाडू शकता.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; कुठे करावं लागणार अर्ज? युट्यूब व्हिडीओ

Leave a Comment