बॅटरी संचलित फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सुरु, महाडीबीटी वर “या” तारखे अगोदर अर्ज करा |battery operated spray pump subsidy Yojana

battery operated spray pump : शेतकरी बांधवांना 100% अनुदानावर नॅनो युरिया, डीएपी, बॅटरी संचलित फवारणी पंप वितरणासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू आहे. अर्ज करण्याची मुदत पूर्वी 30 जून होती, परंतु 24 जुलै रोजी नॅनो युरिया आणि डीएपी घटकाची सोडत यादी काढण्यात आली आहे. मात्र, बॅटरी संचलित फवारणी पंप साठी अद्याप सोडत यादी घोषित झालेली नाही. कृषि विभागाने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली आहे.

सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि मूल्यसाखळीला चालना देणे हे उद्दीष्ट ठेवून राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजनेतर्गत सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षांत विशेष कृती योजना राबविली जात आहे.

2024-25 मध्ये, चालू खरीप हंगामासाठी या योजनेंतर्गत खालील निविष्ठा 100% अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जातील. मागील 10 दिवसांपासून अर्ज प्रक्रिया पोर्टलवर सुरू असून अर्जांची संख्या अत्यल्प असल्याने अर्ज करण्याची मुदत 6 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

battery operated spray pump subsidy Yojana

वरील सुविधांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जांद्वारे होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

अर्ज करण्याची पद्धत :- (battery operated spray pump)

  1. भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login लाभार्थी शेतकऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  2. अर्ज करा बाबीवर क्लिक करा.
  3. कृषि यांत्रिकीकरण -> बाबी निवडा यावर क्लिक करा.
  4. मुख्य घटक बाबीवर क्लिक करा – कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य.
  5. तपशिल बाबीवर क्लिक करून – मनुष्यचलीत औजारे घटक निवडा.
  6. यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून – पिक संरक्षण औजारे निवडा.
  7. मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरी संचलित फवारणी पंप (गळीतधान्य)/कापूस निवडा.
  8. अर्ज जतन करा आणि मेन्यू वर जाऊन अर्ज सादर करा.

(अर्ज करण्याचा कालावधी: 6 ऑगस्ट 2024 पर्यंत)

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना कधी मिळणार पैसे? अजित पवारांनी केली योजनेबाबत मोठी घोषणा!

Leave a Comment