HSC Result Celebration 2025: राज्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आणि केक कापून आनंद साजरा केलेला आहे. तर दुसरीकडे नापास विद्यार्थ्यांना धीर देण्याचं काम देखील सध्या सोशल मीडियावर करण्यात येत आहे. परीक्षा बारावीची होती आयुष्याची नाही. त्यामुळे अपेक्षित यश मिळालं नसलं तरी देखील विद्यार्थ्यांनी जाता पुन्हा नव्याने जोमाने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. त्यासह परीक्षेत जरी कमी गुण मिळालेले असले तरी देखील आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर निवडायला हवे असे देखील मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यातच कर्नाटकच्या बागलकोट मधील पालकांनी आपल्या नापास मुलाचा निकालाचा आनंद व्यक्त केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
परीक्षेत नापास तरीही; केक कापून केलं सेलिब्रेशन!
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेला भविष्याचा पाया मानला जातो. त्यामुळे बोर्ड परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी नापास झाल्यावर पालकांकडून रागावण्यात येते. आणि बोलणे देखील खावे लागतात मात्र कर्नाटकच्या बागलकोट येथील एका पालक दाम्पत्यांनी चक्क आपल्या नापास मुलाचे केक कापून सेलिब्रेशन केलेले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला १० वी बोर्ड परीक्षेत केवळ 32 टक्के गुण मिळालेले आहेत.
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात राहणाऱ्या अभिषेक चोलाचगुड्डा हा येथील बसवेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे यंदा तो 10 वी बोर्ड परीक्षेत शिक्षण घेत होता. त्यामुळे अभिषेक ला 600 पैकी फक्त 200 गुण मिळालेले आहेत. म्हणजे जवळपास 32% गुण प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे तो सहाच्या ६ विषयात नापास झालेला आहे. त्यामुळे त्याचे मित्र आणि काही शेजारी तसेच नातेवाईक यांच्याकडून त्याची खिल्ली देखील उडवण्यात येत आहे. मात्र आपल्या मुलाची खेळणी उडवणाऱ्यांना अभिषेकच्या पालकांनी चांगले चपराक लावलेली आहे. कारण आपल्या नापास मुलाच्या गुणवत्तेवर नाराज न होता. केक कापून आई-वडिलांनी त्यांचे सेलिब्रेशन केलेल आहे. तू नापास झाला असेल पण आयुष्याच्या परीक्षेत नापास होणार नाही. असे म्हणता त्याच्या आई वडिलांनी जादू की झप्पी दिली आहे. सध्या अभिषेक आणि त्याच्या आईवडिलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.