Kusum Solar Scheme: पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी केले 88 हजार ऑनलाईन अर्ज

By Bhimraj Pikwane

Published on:

Kusum Solar Scheme

Kusum Solar Scheme: सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिवसा विजेची पूर्तता व्हावी यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले आहे. आतापर्यंत तब्बल 88 हजार शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कुसुम सोलापूर योजनेचे ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. कुसुम सोलर पंप योजनेचा राज्याचा कोठा आता एकच ठेवलेला आहे. सध्या हा कोठा सर्व जिल्हा न्याय देण्यात येत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे. परंतु ऑनलाईन अर्ज सादर करत असताना शेतकऱ्यांना खूप सार्‍या अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी देखील महाऊर्जेच्या वतीने प्रयत्न चालू आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माहूरच्या माध्यमातून राज्यामध्ये कुसुम सोलर पंप (Kusum Solar Scheme) योजनेचा टप्पा दोन 17 मे 2023 पासून सुरू झाला. कुसुम सोलर पंप योजनेच्या दुसऱ्या टप्पा अंतर्गत शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु ऑनलाईन अर्ज सादर करत असताना एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रयत्न केल्यामुळे कुसुम सोलर पंप योजनेचे संकेतस्थळ बंद पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना खूप सारे अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी महाऊर्जाच्या वतीने पोर्टलमध्ये दररोज अपडेट करणे चालू आहे असे महाऊर्जाचे संचालक रवींद्र जगताप यांनी सांगितले आहे.

Mahaurja मार्फत संकेतस्थळामध्ये खुप सार्‍या दुरुस्ती जरी केले असल्या तरी शेतकऱ्यांना अजूनही ऑनलाईन अर्ज करताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत.

अर्ज सादर करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्याला किती कोटा आहे, तसेच ऑनलाईन अर्ज सादर करत असताना तीन चार वेळेस पेमेंटचा भरणा केल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामधून जमा होते ती रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाही. जर रक्कम खात्यामधून वजा झाली तर शेतकऱ्यांना ओटीपी येण्यासाठी अडचणी येत आहेत यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज सादर करत असताना आपले रजिस्ट्रेशन यापूर्वी झाले आहे असे नोटिफिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळते यासारख्या अनेक अडचणी महाऊर्जाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना येत आहे.

वरील साऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाऊर्जा कडून प्रयत्न सुरू आहे असे रवींद्र जगताप यांनी सांगितले आहे.

सर्व शेतकऱ्यांनी Kusum Solar Scheme या योजनेचा लाभ घ्यावा

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी कुठल्याही प्रकारची शेवटची तारीख नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. जोपर्यंत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर होणार आहे तोपर्यंत संकेतस्थळ सुरू राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी न करता प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यावा.

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

3 thoughts on “Kusum Solar Scheme: पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी केले 88 हजार ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment