Jivant Satbara Campaign: सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे – ‘जिवंत सातबारा’. ही मोहीम विशेषतः शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वारस हक्काची नोंदणी जलद तसेच सुटसुटीत करण्यासाठी राबवली जात आहेत.
Land Record
वारस नोंदणीसाठी का आवश्यक आहे ‘जिवंत सातबारा’ मोहीम? Jivant Satbara Campaign
सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर वेळेवर होत नाहीत. आणि यासाठी देखील खूप मोठा कालावधी लागतो. यामुळे वारसांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. तसेच, जमिनीच्या खरेदी-विक्री, शेतीसाठी कर्ज घेणे, सरकारी अनुदान मिळवणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण होत चालले आहे. Land Record
ही समस्या सोडवण्यासाठी १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रभर ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केलेली आहे. या अंतर्गत, मृत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती अधिकृत सरकारी अभिलेखांमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत काय होईल? Land Record
- मृत शेतकऱ्यांच्या वारसांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर केली जाणार आहेत.
- सातबारा उताऱ्यावरील मृत खातेदारांची नावे हटवून त्यांच्या वारसांची नोंद केली जाणार.
- जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सातबारा अपडेट केला जाणार आहे.
- शेतकऱ्यांचे कर्ज, अनुदान, आणि सरकारी योजनांचे लाभ सहज उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांनी काय करावे? Land Record
जर आपल्या कुटुंबातील कुणी शेतकरी मृत झाला असेल आणि त्याच्या नावावर जमीन असेन, तर तुम्ही वारस म्हणून आपल्या नावे नोंदणी करण्यासाठी स्थानिक महसूल कार्यालयात (तालाठी/तहसीलदार) संपर्क साधणे आवश्यक आहे.
ही मोहीम संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार असून, शेतकऱ्यांच्या हक्कांची नोंदणी सुटसुटीत आणि जलद करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहेत. ( Land Record )
1 एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू 👈
जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत नाव नोंदणी प्रक्रिया
- वारसांची नोंदणी करण्यासाठी २१ एप्रिल ते १० मे २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
- या दरम्यान, तलाठी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारसांची नोंदणी करणार आहे. त्यानंतर मंडळ अधिकारी आवश्यक तपासणी करून नोंदणीला अंतिम मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर, सातबारा दुरुस्त करून मृत व्यक्तीच्या जागी वारसाचे नाव अधिकृतरीत्या नोंदवले जाणार आहे. (Land Record)
सातबारा उताऱ्याचे महत्त्व
- सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा
- सरकारी दस्तऐवज आहेत.
- यामध्ये शेतीची मालकी, जमिनीची माहिती, पीक घेतल्याचा तपशील, शेतजमिनीवरील कर्ज, विहीर, झाडे यांची माहिती नोंदवलेली असतात.
यामुळेच शेतकरी सातबाराला आपल्या हक्काचा आणि मालकीचा पुरावा मानतात. सातबारा हा प्रॉपर्टी रेकॉर्ड (Property Record) म्हणून ओळखला जात आहेत. शेतकरी जेव्हा कर्ज घेतात, सरकारी योजना घेतात किंवा जमीन खरेदी-विक्री करतात, तेव्हा सातबारा उतारा आवश्यक असते ( Land Record )
थोडक्यात सांगायचं तर , “शेती + शेतकरी = सातबारा” असे म्हणता येते
जिवंत सातबारा मोहिमेतील प्रमुख टप्पे
- ✅ १ ते ५ एप्रिल – तलाठी गावात जाऊन चावडी वाचन करतील आणि गावातील मृत खातेदारांची यादी तयार कयणार.
- ✅ ६ ते २० एप्रिल – मृत व्यक्तीच्या वारसांनी संबंधित कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करणे आवश्यक.
- ✅ २१ एप्रिल ते १० मे – तलाठी ई-फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांच्या जागी वारसाचे नाव नोंदवणे.
- ✅ १० मेनंतर – मंडळ अधिकारी अंतिम निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करतील आणि वारसाचे नाव अधिकृतरीत्या सातबारावर येणार आहे.