Mock Drill News: भारत पाकिस्तान मध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे. संभाव्य युद्ध परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालंय. या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी 7 मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.
Mock Drill News
हल्ला झाल्यास शत्रूपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे. यासाठी मॉकड्रिल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
युद्धजन्य परिस्थितीची बुधवारी रंगीत तालीम होणार आहे. आणि सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे मॉक ड्रिल च माध्यमातून दिले जाणार आहेत. भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचा बीमोड करण्याआधी भारत सज्ज झाला आहे. पाकिस्तान वर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावीत. काय उपाययोजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे
7 मे रोजी सर्व राज्यांना मॉकड्रिल आदेश देण्यात आलेले आहेत.
सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आले.
हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजणार आहे.
विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शत्रूंन हल्ला केल्यास बचावाचा प्रशिक्षण दिले जाईल.