RTE Admission: आरटीई प्रवेश प्रक्रिया या तारखेपासून होणार सुरु, प्रवेशाच्या जागेत वाढ

By Bhimraj Pikwane

Published on:

RTE Admission

RTE Admission: शालेय शिक्षण विभाग शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रवेश (RTE Admission) अंतर्गत मोफत प्रवेश प्रदान करतो. मात्र यंदा शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत बदल केला. (संभाजीनगर) या बदलांमुळे आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना आता ५ एप्रिलनंतर प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा मिळतात. आत इंग्रजी शाळा जास्त आहेत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जाते. विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर लॉटरीद्वारे प्रवेश निश्चित केला जातो. 2024-25 शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया 5 एप्रिलनंतर सुरू होईल.

RTE Admission : या तारखे पासून प्रवेश सुरु

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला असून राज्यभरातील ७५,८५६ शाळांमधील ९,७१,२२३ जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात म्हणजे 5 एप्रिलनंतर सुरू होईल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ५७० पैकी २ हजार ८१६ शाळांनी नोंदणी केलेली असून जिल्ह्यातील क्षमता ४० हजार ४५७ इतकी आहे.

RTE 25% Admission Website – https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment