Solar Pump Yojana: पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करताना ही काळजी घ्या

Solar Pump Yojana राज्यामधील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यामध्ये व केंद्रामध्ये प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना ही योजना सुरू करण्यात आली. 17 मे 2023 पासून राज्यांमध्ये कुसुम सोलर पंप योजना टप्पा दोन अंतर्गत पुन्हा नवीन अर्ज नोंदणीसाठी सुरू झालेले आहेत. परंतु अर्ज करत असताना शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना (Solar Pump Yojana) मे 2021 मध्ये एक शासन निर्णय घेऊन सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख सौर कृषी पंप या पद्धतीने पाच वर्षासाठी पाच लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून ठेवण्यात आलेले आहे.

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावरती सोलर पंप देण्यात येतात. सध्याही राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये कोठे उपलब्ध असून अर्ज देखील सुरू आहेत. आपणही जर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्ज करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी आहे.

नवीन अर्ज करताना शेतकऱ्यांनी जास्त घाई करू नाही कारण की नवीन कोठा उपलब्ध होत राहत आहे. महा ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी दररोज अतिरिक्त कोठा उपलब्ध करून देण्यात येतो. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा कोठा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन सादर करावा. शक्यतो अर्ज करत असताना शेतकरी एकाच वेळी वेबसाईटवर अर्ज करत असतात त्यामुळे वेबसाईटवर जास्त लोड येतो आणि संकेतस्थळ बंद पडते. यामुळे रात्री शक्यतो उशिरा शेतकऱ्यांनी आपला अर्ज सादर करावा.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत खुल्या प्रवर्गांमधील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप देण्यात येतात तर अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सोलार पंप देण्यात येतात. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना फक्त पाच ते दहा टक्के रक्कम भरावी लागते उर्वरित रक्कम ही शासन त्यांच्या सोयीच्या मधून भरते.

शेतकऱ्यांनी अर्ज करताना ही काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी अर्ज सादर करत असताना महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच आपला अर्ज सादर करावा. कुसुम सोलर पंप योजना च्या भरपूर साऱ्या बनावट वेबसाईट सुरू झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वापर करावा असे आव्हान देखील महाऊर्जाच्या मार्फत करण्यात आलेले आहे.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

वरील दिलेल्या वेबसाईटवरूनच शेतकऱ्यांनी आपला अर्ज सादर करावा. जर शेतकरी बांधवांना अर्ज ऑनलाईन सादर करत असताना काही अडचणीत असेल तर 020-35000456/ 020-35000457 या नंबर वरती संपर्क साधू शकता.


अर्ज सादर करत असताना शेतकऱ्यांकडून जर शंभर रुपयाचा भरणा झाला असेल तर पुन्हा पेमेंट करण्याची गरज नाही. परत नवीन रजिस्ट्रेशनच्या लिंक वरती जाऊन आपण जशी अगोदर माहिती भरली होती सेम तशीच माहिती पुन्हा भरावी त्यानंतर आपल्याला भूमी अभिलेखच्या पेजवर जाईल त्यावेळी सर्व डिटेल भरून म्हणजेच आपला जिल्हा तालुका गाव गट क्रमांक ही माहिती भरून आपला अर्ज सबमिट करावा त्यानंतर आपल्याला एक ओटीपी मिळेल व त्यानंतर आपल्या अर्जामध्ये भरलेल्या मोबाईल क्रमांकावर ती आपला आयडी आणि पासवर्ड मिळेल.

Leave a Comment