EPFO News Update: हायर पेन्शन अर्जासाठी मुदतवाढ, पहा काय आहे नवीन तारीख

EPFO News Update ईपीएफओ ने पुन्हा एकदा उच्च निवृत्तीवेतन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या अगोदरची तारीख 26 जून 2023 ही शेवटची तारीख होती परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी अनेक अर्जदारांना वेबसाईटवर अर्ज करण्याकरता मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईटवर हा बिघाड झाल्यामुळे ईपीएफ होणे तारीख वाढण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

EPFO ने या अगोदरही पेन्शन साठी अर्ज करण्यासाठी यापूर्वीच दोन वेळेस मुदत वाढ दिली होती. पहिल्यांदा ही तारीख तीन मार्च होती त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देऊन 26 जून ही तारीख ठरवण्यात आली होती परंतु आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा अंतिम तारीख वाढवण्यात आलेली आहे. 26 जून वरून आता 11 जुलै ही तारीख अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली आहे.

EPFO Higher Pension Scheme काय आहे

हायर पेन्शन याचा अर्थ म्हणजेच अधिक निवृत्तीवेतन. १९९६ साली EPFO च्या परीक्षेत अकरा कायद्यामध्ये एक नियम टाकण्यात आला होता त्यानुसार EPFO च्या सदस्यांना या नियमानुसार पेन्शन कॉन्ट्रीब्युशन मध्ये संपूर्ण पगारामध्ये ८.३३ % वाडीला मंजुरी देण्यात आली होती.

epfo असा करा हायर पेन्शन साठी अर्ज

  • हायर पेन्शन साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई-सेवा पोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर त्या ठिकाणावरील उजव्या बाजूला पेन्शन ऑन हाय सॅलरी चा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर दिसेल त्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन पाहावयास मिळतील.
  • जर आपण एक सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेले असाल तर पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन निवडा.
  • जर आपण सध्या जॉब करत असाल तर दुसरा पर्याय त्या ठिकाणी निवडा.
  • त्यानंतर यु ए एन नंबर आपले नाव जन्मतारीख आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती त्या ठिकाणी भरावी लागेल.
  • वरील माहिती भरल्यानंतर आपण नोंदवलेल्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल.
  • ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment