Ration Card List: शिधापत्रिकेच्या ऑनलाइन यादीत नाव कसे तपासायचे?
Ration Card Update: संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार शिधापत्रिका (Ration Card List) मिळण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली आहे. शिधापत्रिकेद्वारे पात्र कुटुंबांना अनुदानित दरात अन्नधान्य, तेल आणि इतर खाद्यपदार्थ मिळतात. या लेखात आपण शिधापत्रिकेच्या ऑनलाइन यादीत आपले नाव कसे तपासता येईल याची माहिती घेणार आहोत.
शिधापत्रिकेची प्रकार | Ration Card List
महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकांची तीन प्रकारात विभागणी केली आहे:
- APL शिधापत्रिका (पांढरा रंग) : दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या लोकांना APL शिधापत्रिका दिली जाते. या शिधापत्रिकेसाठी वार्षिक उत्पन्न १,००,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- BPL शिधापत्रिका (पिवळा रंग): दारिद्र्यरेषेखालील लोकांना BPL शिधापत्रिका दिली जाते. या शिधापत्रिकेसाठी वार्षिक उत्पन्न १५,००० ते १,००,००० रुपये दरम्यान असणे आवश्यक आहे.
- शिधापत्रिका (भगवा रंग) : अंत्योदय शिधापत्रिका अत्यंत गरीब लोकांना दिली जाते. ज्यांचे कुठलेही उत्पन्न नाही अशा लोकांना ही शिधापत्रिका दिली जाते.
शिधापत्रिकेची नवीन अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन पद्धतीने शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे शक्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या http://mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतो. या संकेतस्थळावर ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर ‘रेशन कार्ड‘ पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘जिल्हा वर्गीकरण आणि रेशन कार्डधारकांची संख्या’ या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर शिधापत्रिकेची यादी दिसेल.
Ration Card Update: शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाचा अपडेट! जाणून घ्या काय बदल झाले
शिधापत्रिकेच्या यादीत नाव तपासणे
शिधापत्रिकेची नवीन यादी महाराष्ट्र शासनाकडून वर्षभरात अपडेट केली जाते. या यादीत लाभार्थ्यांची नावे त्यांच्या वयानुसार अपडेट केली जातात. शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना आता घरबसल्या या यादीत आपले नाव तपासता येईल.
गरज नसल्यास यादीतून नाव वगळण्याची सोय
शिधापत्रिका मिळण्याची आर्थिकदृष्ट्या गरज नसलेल्या नागरिकांना याऊन या यादीमधून आपले नाव वगळण्याची सोय उपलब्ध आहे. अशा नागरिकांनी सरकारी दुकानामध्ये जाऊन तेथील अधिकृत अधिकार्यांकडे स्वत:चे नाव यादीतून वगळण्याबाबत अर्ज करावा.
अशाप्रकारे नागरिकांना घरबसल्या शिधापत्रिकेच्या यादीत आपले नाव तपासता येईल. अधिकची माहिती हवी असल्यास सरकारी संकेतस्थळाकडे संपर्क साधता येईल.